जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा फक्त 1 रुग्ण आढळून आला. हा रुग्ण आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. तालुक्यात त्यामानाने रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे.
रविवारी आलेल्या रिपोर्टनुसार हा रुग्ण जुन्या कॉटन मार्केट परिसरातला आहे. तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 760 झाली आहेत. वणी शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने थोडासा दिलासा मिळत आहे.
सोमवारी 33 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात केवळ एकच व्यक्ती पॉजिटिव्ह आली. सोमवारी 15 संशयितांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
तालुक्यात 64 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 760 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 695 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या 3 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 64 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 52 जण होम आयसोलेट आहेत. 12 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 12 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूंची संख्या 20 झाली आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)