सुधाकरसाव लोणारे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

लोणारे परिवारातील कर्तापुरुष हरवल्याने कोसळला दुःखाचा डोंगर

0

नागेश रायपुरे, मारेगाव: नवरगाव / मारेगाव येथील मसाला व किराण्याचे प्रसिध्द व्यापारी सुधाकरसाव लोणारे (64) यांचे गुरुवारी रात्री 3 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. लोणारे परिवारातील कर्ता हरवल्याने, दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Podar School 2025

परिसरात प्रसिद्ध असलेले हा परिवार मूळचा नवरगाव येथील. जिरे,लसूण,कांद्याचे चिल्लर व ठोक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते सुधाकरसाव लोणारे यांना हृदय विकाराचा 12 वाजता दरम्यान झटका आला. दरम्यान त्यांना तत्काळ वणी येथील खाजगी दवाखान्यात भरती केले होते. मात्र परस्थिती नाजूक असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र चंद्रपूरला जाताजाता वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या पत्नी सुरेखा, मुलं संदीपसाव व मनोजसाव, मुलगी संगीता, भाऊ प्रभाकरसाव, ज्ञानेश्वरसाव, बबनसाव तसेच मारोतीसाव, बिसनसाव, महादेवसाव बिसनसाव लोणारे असा मोठा आप्तपरिवार आहे.

लोणारे परिवार तसे तालुक्यातील नवरगावचे मसाला व किराण्याचे चिल्लर व ठोक व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून ते मारेगाव येथे एकत्रित कुटुंबात एकाच छत्रछायेत राहतात.

अलीकडे तर मुलाचा विवाह झाला, की ते वेगळी चूल मांडतात; मात्र लोणारे परिरावतील वैशिष्ट्य म्हणजे ते चार भावांचे 40 जणांचे कुटुंब आजही एकाच घरात मिळून मिसळून राहतात. एकाच चुलीवर शिजवले अन्नसुद्धा खातात. असा एकोपा जपणाऱ्या परिवाराला सुधाकरसाव यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.