आज परिसरात एकूण 9 पॉजिटिव्ह

शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 6 कोरोनाबाधित

0

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 9 रुग्ण आढळलेत.आलेले रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आहेत. पॉजिटिव्ह व्यक्ती गणेशपूर 2, शिंदोला 1, मारेगाव 1, सुकनेगाव1, पळसोनी 1 आणि वणी शहर 3आहेत. या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 779 झाली आहेत.

आज 25 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. आज 22 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आज 39 अहवाल प्राप्त झालेत. अद्याप यवतमाळहून 50 अहवाल येणे बाकी आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यात 33 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 788 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 752 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज एका कोरोनामुक्त व्यक्तीला सुटी मिळाली. सध्या तालुक्यात 33 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 10 जण होम आयसोलेट आहेत.

23 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 9 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.