मारेगावात वाहू लागले नगरपंचायत निवडणुकीचे वारे

10 नोव्हेंबरच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष

0

नागेश रायपुरे, मारेगाव: सध्या शहरात नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. इच्छुकांच्या भाऊ गर्दीत हवसे गवसे ही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहे. 10 नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच इच्छुक उमेदवार आपले पत्ते उघड करणार आहेत.

गेल्या पाच वर्षांपूर्वी मारेगाव ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाले. सधया नगर पंचायतीचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे प्रभागनिहाय आरक्षण येत्या 10 नोव्हेंबरला निघणार आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. यात कुणाचे स्वप्न भंगणार आहे तर कुणाला लॉटरी लागू शकते.

गेल्या वेळी चौरंगी लढत
गेल्या निवडणुकीत चौरंगी लढत झाली. यात शिवसेनेचे 5, भाजपचे 3, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 3 व अपक्ष 2 असे 17 नगसेवक होते. तर स्वीकृत नगरसेवक शिवसेना, राष्ट्रवादी चे प्रत्येकी 1 असे एकूण 19 नगरसेवक होते. अखेर शिवसेनेच्या बाजूने 1 अपक्ष उमेदवार आल्याने शिवसेनेची बाजू मजबूत झाली आणि अखेर नगर पंचायतीवर शिवसेना, भाजप पक्षाने युती करून आपली सत्ता स्थापन केली होती.

मात्र यंदा राजकीय वातावरण पूर्ण बदलले आहे. सध्या राष्ट्रवादीकडे कुणीच वाली नाही. तर दुसरीकडे ग्राम पंचायत पासून सत्ता काबीज करणारे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकून दुसऱ्या नवीन संघटनेची स्थापना केली आहे. ते आगामी निवडणूका स्वबळावर लढविणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाला यावेळी काही प्रमाणात फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

ऍक्टिव्ह आहोत हे दाखविण्यासाठी सध्या सर्वच पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय पक्षाचे पुढारी जागे होवून विविध मागण्याचे निवेदन, उपोषण, आंदोलन, पक्ष प्रवेश आदी राजकीय स्टंट बाजीला उत आला आहे. येत्या 10 नोव्हेंबरला 17 ही प्रभागातील आरक्षण स्पष्ट झाल्यावर कुणाला संधी मिळते तर कुणाचे स्वप्न भंगते हे स्पष्ट होईल.

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.