शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या

केगाव (मार्डी) येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. शुक्रवारी रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान केगाव (मार्डी) येथील एका शेतकरी पुत्राने विष घेऊन आत्महत्या केली. अखिल नथ्थु किनाके (35) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार, संध्याकाळच्या सुमारास मृतक अखिल घरी एकटाच होता. दरम्यान त्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. अखिलच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याच्या मागे पत्नी दोन लहान मुले, आई वडील, तीन विवाहित बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पो. नि. जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात जमादार सुरेंद्र टोंगे करीत आहे. 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.