खापरी येथील व्यायाम शाळेचे बांधकाम निकृष्ट
रेती ऐवजी काळ्या चुरीचा वापर, ठेकेदारावर कार्यवाहीची मागणी
सुशील ओझा, झरी: नागरिकांचे शरीर व आरोग्य सुदृढ व चांगले रहावे याकरिता शासनातर्फे ग्रामपंचायत पातळीवर व्यायाम शाळेचे बांधकाम केले जात आहे. परंतु अनेक ठिकाणी व्यायाम शाळेचे नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील खापरी येथील रहिवासी पवन आत्राम यांनी गावातीलच होत असलेल्या नित्कृष्ट दर्जेच्या व्यायाम शाळेची तक्रार झरी येथील शाखा अभियंता यांच्या कडे केली आहे.
ठेकेदारांनी पिलर ते जुडाई पर्यंतच्या बांधकामात रेती ऐवजी काळ्या चुरीचा वापर करीत आहे. तसेच बांधकामात सिमेंटचा वापर कमी प्रमाणात केल्या जात आहे. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सदर कामाचे इस्टीमेट 7 लाखांचे आहे. यातील अर्धेअधिक काम झाले आहे. मात्र त्या निकृष्ट साहित्य वापरल्याने या बांधकामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सदर कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी पवन आत्राम यांनी केली आहे.
हे पण वाचा….
[…] […]