दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांचा कापसावर डल्ला

पेंढरी येथील घटना, तीन आरोपीस अटक

1

नागेश रायपुरे, मारेगाव: दिवाळीच्या धामधुमीत सारेच असताना तालुक्यातील पेंढरी येथील एका शेतक-याच्या घरातुन चोरट्यानी चक्क दिवाळीच्या दिवशी डाव साधत कापूस चोरून नेला. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अद्याप एक आरोपी फरार आहे.

पेंढरी येथे रुखमांगद दुमोरे (40) हे शेतकरी राहतात. शेतात झालेल्या कापसाचा साठा त्यांनी घरी करून ठेवला होता. 14 तारखेला दिवाळी निमीत्त ते घराला कुलुप लावून दिवाळी साजरी करण्यासाठी मारेगाव येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत चार चोरट्यांनी दुमोरे यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला व दोन क्विंटल कापसाचे गाठोडे घेऊन ते पसार झाले.

दुस-या दिवशी रुखमांगद जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन बघितले असता घरातून दोन क्विंटल कापूस चोरी गेल्याचे आढळून आले. त्यांनी या संदर्भात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी काही तासातच या घटनेतील आरोपी पोतू भुतू आत्राम (35) चरनदास रामा आत्राम (27) कैलास चेंडकू टेकाम (35) यांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी गावातील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर भीमराव ज्ञानेश्वर टेकाम (30) हा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

हे पण वाचा….

धक्कादायक… ! उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाण्याचा पुरवठा

हे पण वाचा….

प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…

Leave A Reply

Your email address will not be published.