विवेक तोटेवार, वणी: वीज बिलात सवलती मिळावी या मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी वणीत भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात दुपारी 12 वाजता शिवतीर्थाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना भरमसाठ बिल आले. महाविकास आघाडी सरकारने वीजबिल माफ करणार असल्याचा शब्द दिला. परंतु आता सरकारने आपला शब्द पळाला नाही असा आरोप करत आज राज्यभरात वीजबिल होळी आंदोलन पुकारण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वणीतही हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी वीजबिलाची होळी केली. त्यानंतर आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
निवेदना लॉक डाऊन काळातील वीजबिल माफ करावे, शेतक-याना दिवसा आठ तास वीज देण्यात यावी, बिघडलेले रोहित्रे तीन दिवसात दुरुस्त करावे, कृषी पंपाचे ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी शेतकऱ्यांकडून 3000 रुपयांची वसुली बंद करावी, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी, सौर ऊर्जा जोडणी तात्काळ करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सरकारने विश्वासघात केला- आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
लॉकडाऊन मुळे नागरिक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता त्यांनी वेगळाच पवित्रा घेतला आहे. त्यांच्या घुमजावामुळे सर्वसामान्यांना वीजबिल भरवे लागणार आहे.
: आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा क्षेत्र
यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवी बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, किशोर बावणे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे उपस्थित होते.
हे पण वाचा:
हे पण वाचा: