मंगळवारी तालुक्यात आढळलेत 7 पॉजिटिव्ह

पुन्हा झाली कोरोनाबाधितांमध्ये वाढ

0

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील एकता नगर 1, भीमनगर 1, रंगारीपुरा 1, आंबेडकर चौक 1 आणि चिखलगाव 1, चोपण 2 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे.

मंगळवारी 49 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. तर पॉझिटिव्ह रॅपिड टेस्ट 06 जणांची झाली. 48 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 165अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 81 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 946 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 842 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. मंगळवारी 1 कोरोनामुक्त व्यक्तीला सुटी झाली. सध्या तालुक्यात 81 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 44 जण होम आयसोलेट आहेत. 15 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 22 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूंची संख्या 23 झाली आहे.

कोरोनाबाधित वाढताहेत, तेव्हा काळजी घ्यावी

गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हेदेखील वाचा

आणखी एकाची विष प्राशन करून आत्महत्या

हेदेखील वाचा

मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन आत्महत्या

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.