शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यावर मारेगावात गुन्हा दाखल

आचारसंहिता भंग प्रकरण, शिक्षकवर्गात खळबळ

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विधान परिषद अमरावती, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक (45) रा.वाशिम यांच्यावर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू आहे.

शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करून मारेगाव तालुक्यातील काही शिक्षकांना पैठणी साड्या आणि पैसे वाटप केल्याचा आरोप आहे. अशा आशयाची तक्रार प्रवीण वानखडे यांनी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त यांचेकडे केली.

चौकशी दरम्यान शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी साड्या आणि पैसे वाटप केल्याचे उघडकीस आल्याने यात फिर्यादी आचारसंहिता पथकप्रमुख तथा विस्तार अधिकारी पं.स.मारेगावचे संदीप वाघमारे (32) यांच्या तक्रारीनुसार

मारेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि.जगदीश मंडलवार यांनी उमेदवार किरण सरनाईक यांच्या विरोधात तालुक्यातील शिक्षकांना पैठणी साड्या व पैसे वाटून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी

कलम 297/19 कलम 188,171(ई) भादंवीसह कलम 123 (1)क (ख) लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उप. वि.पो.अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात पो. नि.जगदीश मंडलवार करत आहे.

हेदेखील वाचा

मारेगाव पोलिसांची कोंबडबाजारावर धाड

हेदेखील वाचा

मंगळवारी तालुक्यात आढळलेत 7 पॉजिटिव्ह

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.