ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी- कृती समितीची मागणी

रविवारी धनोजे कुणबी समाज भवन येथे सभा

0

जब्बार चीनी, वणी: ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना ओबीसी जातनिहाय जनगणना कृतीसमितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, 2021 मध्ये होणार्‍या जनगणना कार्यक्रमात ओबीसीसाठी स्वतंत्र काॅलम करुन ओबीसीची जनगणना करावी. 

ओबीसींची जनगणना अनेक दशकांपासून करण्यात आली नाही. देशात 1931मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यात जातीच्या आधारावर जवळपास 52 टक्के ओबीसी असल्याचे स्पष्ट झाले होते. याच आधारावर मंडल आयोगाची स्थापना करण्यात येऊन ओबीसींना 27 टक्के आरक्षणाची शिफारस ही करण्यात आली होती. संविधानाच्या कलम 340 अंतर्गत मागासवर्गीयांसाठी सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी तसेच ओबीसी प्रवर्ग यांच्या उत्थानासाठी जनगणना केंद्र सरकारतर्फे होणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याचे दिसून येते. असे निवेदनात म्हटले आहे.

ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, यासाठी विविध वेळी आंदोलने व मागणी करण्यात आली आहे. मात्र या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी जोपर्यंत ओबीसी जनगणना कॉलम प्रश्नावलीत अंतर्भूत केला जात नाही तोपर्यंत 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेचा विचार स्थगित करण्यात यावा. अशी मागणीही ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

रविवारी सभेचे आयोजन 

सन 1931 साली जनगणना झाली होती. त्यावेळी 52% समाज ओबीसी होता. त्यामुळे 27% आरक्षण मिळाले होते. सर्व OBC (VJ, Nt, SBC) प्रवर्गातील समाजबांधवांनी आपली जातनिहाय जनगणना करून घेण्यासाठी वणी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या दृष्टिकोनातून विचार-विनिमय करण्यासाठी रविवार दि.२९ नोव्हेंबर २०२० ला सायंकाळी ५:०० वाजता वणीतील धनोजे कुणबी समाज भवन येथे सभेचे आयोजन केले आहेे. सर्व समाजबांधवांनी अगदी वेळेवर न चुकता उपस्थित राहण्याची विनंती OBC (VJ, Nt, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व्दारे करण्यात आली आहे.

 निवेदन देताना समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार, सचिव संजय पेचे, मोहन हरडे, गजानन चंदावार,भाऊसाहेब आसुटकर, अशोक चौधरी, राजू तुराणकर, प्रवीण खानझोडे, काशीनाथ पंचकटे, विवेक ठाकरे, सिद्दीक रंगरेज, मारोती जीवतोडे, विकास चीडे, उमेश रासेकर, अमोल टोंगे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

हेदेखील वाचा

आज वणी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

प्रा. प्रणिता प्रशांत भाकरे यांना पितृशोक

 

 

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.