कोसारा ग्रामपंचायत सरपंच व सचिवावर त्वरित कार्यवाहीची मागणी
१ लाख १८ हजार ४६० परस्पर खर्च केल्याचा आरोप
सुशील ओझा,झरी: तालुक्यातील कोसारा येथील ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी तलाव हर्रासचे पैसे बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च केल्याचा आरोप करीत दोघांवरही कार्यवाही करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. 17 व 22 जुलै रोजी कोसारा येथील सतीश महादेव राऊत व प्रा. शैलेश गजानन आत्राम यांनी ग्रामपंचायत विरुद्ध तक्रार केली होती.
या अनुषंगाने गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी चौकशीकरिता 13 जुलै 2020 रोजी ग्रामपंचायतीला भेट दिली. सतीश राऊत यांनी तक्रार केली, की गावातील तलाव हर्रास केलेली 76 हजार 660 रूपये एवढी रक्कम पावती क्रमांक ००१ बुक क्रमांक १ नमुना क्रमान ७ (सामान्य पावती) हे तक्रारीसोबत जोडण्यात आले होते.
तक्रार व जोडलेल्या पावत्यांवरून सध्या कार्यरत असलेले सचिव गिलबिले यांना गटविकास अधिकारी यांनी विचारणा केली. गिलबिले यांनी त्यांच्यापूर्वी कार्यरत असलेले माजी सचिव वेट्टी यांनी सदर पावती दिलेली असून रोखपंजीमध्येसुद्धा परस्पर नोंद केलेली आहे. रकमेचा भरणा ग्रामपंचायतीच्या सामान्य निधीमध्ये बँकेच्या खात्यात जमा न करता परस्पर खर्च करण्यात आला.
तत्कालीन सचिव वेट्टी यांनी 76 हजार 660 रूपये सरपंच यांना परस्पर दिली. ती रक्कम गाव विकासाकरिता खर्च केल्याचे सरपंच यांनीसुद्धा कबूल केले. वरील रक्कम वेट्टी यांनी 25 जुलै 2017 ला रामचंद्र करलुके यांच्याकडून वसूल केली. सदर रक्कम बँकेत जमा करणे बंधनकारक असताना सचिव व सरपंच यांनी परस्पर खर्च केला हे नियंबाह्य आहे. असे चौकशी दरम्यान सिद्ध झाले. परंतु सदर व्यवहार तत्कालीन सचिव वेट्टी यांनी केल्याचे सरपंच यांनी चौकशी दरम्यान सांगितले.
तसेच गावाततील पुलाचे कामसुद्धा निकृष्ठ करण्यात आले. याचीसुद्धा चौकशी करून कार्यवाही करणार असल्याचे नोंद असून तसे आदेश देण्यात आले. प्रा. शैलेश आत्राम यांच्या तक्रारीनुसार 15 मे 2016मध्ये सामान्य पावती ( नमुना 7) वर गजानन महादेव ठाकरे यांच्याकडून 41 हजार 800 एवढी रक्कम तत्कालीन सचिव वेट्टी यांनी वसूल केले. याबाबत चौकशीदरम्यान सचिव यांनी सदर रक्कम ग्रामपंचायतच्या सामान्य निधीच्या बँकेच्या खात्यात टाकण्यात आले नसल्याचे सांगितले. त्यावेळी बी.बी. पाटील सचिव कार्यरत होते.
दोन्ही वर्षांच्या तलाव हर्रासची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात न टाकता परस्पर खर्च केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सरपंच यांनी परस्पर निधी विकासकामाला लावला. यावरून तत्कालीन सचिव वेट्टी व पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही तसेच संपूर्ण रक्कम वसुलीची कारवाही करणार असल्याचे शेरे बुकात नोंद करण्यात शेरे बुकात नोंद करण्यात आले होते.
परंतु एवढे महिने लोटूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने ग्रामवासियात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तरी दोषींवर त्वरित कार्यवाही करून व संपूर्ण रक्कम वसूल करून ग्रामपंचायत खात्यात जमा करण्यात यावे अशी मागणी प्रा. शैलेश आत्राम व सतीश राऊत यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा