भारत बंद: राजूरमध्ये कडकडीत बंद

गावात सर्वपक्षीय रॅली व सभेचे आयोजन

1

जब्बार चीनी, वणी: कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राजूर कॉलरी येथे 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजूर येथील सर्वपक्ष व सामाजिक संघटनेने बंदचे आवाहन केले होते. बंदला राजूर येथील रहिवाशांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत बंद यशस्वी केला. दरम्यान राजूर वासीयांनी वणी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देऊन कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली.

शेतक-यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने कृषी कायदे पारीत केले. हे कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत देशभरातील शेतकरी संघटनांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर याबाबत पंजाब व हरियानातील शेतक-यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत असताना आंदोलकांतर्फे 8 डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. 

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजूर वासीयांनी १०० % प्रतिसाद देत एक दिवसीय बंद पाळला. स्वयंस्फूर्तीने येथील सर्वच लहान मोठ्या व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन या बंद मध्ये भाग घेतला. बंद दरम्यान सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली आणि येथील शहीद भगतसिंग चौकात जाहीर सभा घेण्यात आली.

या राजूर बंद च्या आंदोलनात माजी पं स सदस्य अशोकभाऊ वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद मिलमिले, कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, डेव्हिड पेरकावार, मोहम्मद असलम, ऍड अरविंद सिडाम, अश्फाक अली, महेश लिपटे, जयंत कोयरे, प्रदीप बांदुरकर, नंदकिशोर लोहकरे, सतीश तेडेवार, नितीन मिलमिले, साजिद खान, अन्वर आदींनी सहभाग घेतला. 

रॅलीनंतर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी निवेदनही देण्यात आले.

हे पण वाचा…

वणीत ‘भारत बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

हे पण वाचा…

संताजी महाराजांनी केला ‘हा’ मोठा चमत्कार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

1 Comment
  1. […] भारत बंद: राजूरमध्ये कडकडीत बंद […]

Leave A Reply

Your email address will not be published.