उद्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

वणी आणि मारेगाव येथे रक्तदान, प्लाझ्मादान शिबिर

0

जब्बार चीनी, वणी: शनिवारी 12 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस वणी व मारेगाव तालुक्यातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वणी व मारेगाव येथे रक्तदान व ऍन्टीबॉडी टेस्ट (प्लाझ्मा डोनेशन) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथे टिळक चौकात तर मारेगाव येथे नगर पंचायत मैदान येथे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजे पर्यंत हे शिबिर घेण्यात येणार आहे.

दरवर्षी शरद पवार यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी सर्वसामान्यांसाठी रक्तदान शिबिर तर कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना ऍन्टीबॉडी टेस्ट करून प्लाझ्मा दान करता येणार आहे. तर इतर इच्छुकांना रक्तदान करता येणार आहे.

इच्छुकांनी ऍन्टीबॉडी टेस्ट करावी: डॉ. महेंद्र लोढा
सध्या कोरोनाचा काळ असल्याने आम्ही ऍन्टीबॉडी टेस्ट शिबिर राबवण्याचे निश्चित केले आहे. ज्या कुणाला कोरोना होऊन गेला असेल. त्यांना या शिबिराचा लाभ घेता येईल. ज्या व्यक्तींच्या शरीरात कोरोना विरोधात लढणा-या ऍन्टीबॉडीचे प्रमाण अधिक असेल, अशा व्यक्तींना प्लाझ्मा डोनेट करता येणार आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना प्लाझ्माची गरज असते. त्यामुळे हा उपक्रम आम्ही राबवित आहे. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे.
– डॉ. महेंद्र लोढा, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस

सदर कार्यक्रम कोरोनासंदर्भातील शासनाचे सर्व मार्गदर्शक तत्वे पाळून करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. महेंद्र लोाढा व जयसिंग गोहोकार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सविता ठेपले, राज बिलोरिया, सूर्यकांत खाडे, अंकुश माफुर, विजया आगबत्तलवार, स्वप्निल धुर्वे, प्रतिभा वंजारे, यु एम तायडे, आशा टोंगे, प्रिया कोकर, वैशाली बहादे, मंदा दानव, फारुख शेख, एम आरिफ यांच्यासह वणी आणि मारेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

हे पण वाचा: 

विवाहितेची नांदेपेरा रोडवर दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या

हे पण वाचा: 

या मुलींनी उभं केलं नवं विश्व, पटकावला बहुमान

Leave A Reply

Your email address will not be published.