नागेश रायपुरे, मारेगाव: ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ह्या प्रमुख मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा 3 जानेवारी 2021ला आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात संयुक्त कृतीसमिती गठित करण्यात आली. त्या अनुषंगाने मारेगाव कृती समितीचे गठन करण्यात आले.
ह्या बैठकीत मोर्चाचे नियोजन कसे राहील ह्याबाबत प्रवीण खानझोडे, ऍड अमोल टोंगे, राजू तुराणकार यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीत मुख्य समन्वयक म्हणून बाबाराव ढवस यांची नियुक्ती करण्यात आली. राजेंद्र पिंपळशेंडे, भास्कर राऊत, प्रवीण लोंढे, मंगेश गवळी, आकाश किन्हेकर, अनुप महाकुलकार, संदीप आस्वले, आनंद नक्षीने, मुजफ्फर शेख,
राजेंद्र पोटदुखे, किशोर ताटकोंडावार, सचिन पचारे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ह्या बैठकीला लीलाधर चौधरी, हेमराज कळंबे, विश्वास पोटे, अनामिक बोढे, अनंत मांडवकर, अनंत महाकुलकार, विजय झाडे, संजय खाडे, प्रवीण लोंढे अविनाश चिंचोलकर आदी ओबीसीबांधव उपस्थित होते.
केंद्रसरकार ओबीसी जातनिहाय जणगणना करण्यात यावी ह्या मुख्य मागणीसाठी महासंघाचे निवेदन देण्यात आले. ह्या निवेदनात 1931ला झालेल्या जनगणनेनंतर एकूण लोकसंख्येच्या 52% असलेल्यांना 27% आरक्षण देण्यात आले. ह्या ओबीसी समूहामध्ये एकूण 6500 पोटजातींचा समावेश आहे. केंद्र सरकारने 16 व्या जनगणना 2021 कार्यक्रम घोषित केला आहे.
त्या अनुषंगाने ह्या संदर्भात जाहीर केलेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये 2019ला जनगणना पूर्वचाचणी( प्रिटेस्ट) करण्यात आली. परंतु त्यामध्ये नमुना प्रश्नावली मध्ये १३ नंबरचा OBC कॉलम समाविष्ट केला तर ओबीसी वर्गाची (सामाजिक और शैक्षणिकदृष्टिने पिछडा वर्ग) ओबीसी वर्गाचा उल्लेख नाही.
आधी ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हायची मात्र गेल्या काही काळापासून ओबीसींची स्वतंत्र जनगणना बंद करण्यात आली. असे ह्या निवेदनात नमूद केले आहे. केंद्र सरकारने अधिकृत होणाऱ्या राष्ट्रीय जनगणना 2021 अंतर्गत होणाऱ्या ओबीसी समुदायाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात करण्यात यावी.
ह्या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारने योग्य पावले उचलावी. ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व इतरही योजनांचा लाभ घेता येणार. ह्यावेळी कार्याध्यक्ष प्रवीण खानझोडे, राजाभाऊ तुराणकर, शशिकांत नक्षिने, ललित लांजेवार, सुरेश मांडवकर, बंडू येसेकर,
संजय गाथाडे, आकाश खंडाळकर, अजिंक्य शेंडे, रामकृष्ण दुधलकर, पुरुषोत्तम नवघरे, सुनील अक्केवार, प्रदीप मुक्के, बंडू सहारे, किसन मोहबिया, हरीश मोहबिया, संदीप गोहोकार, विनोद धाबेकर, सचिन पिंपळकर, विजय कडूकर, विजय दोडके, रवी घुमे, शिरीष क्षीरसागर, राहुल चट्टे, श्रीकांत किटकुले, राजेश पारधी, दिवाकर नागतुरे तसेच बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते..
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा