ढगाळ वातावरणामुळे तूरपिकांचे मोठे नुकसान

सोयाबीन, कापसानंतर तूरही हातातून जाण्याची भीती

0

सुशील ओझा, झरी: गेल्या पंधरा दिवसापासून सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या तूरपिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. ढगाळ वातावरणामुळे तूरपिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

विविध रोगांमुळे तूर पिकावर मोठे संकट येऊन ठेपले आहे. सोयाबीन पीक काढण्याची वेळ आली त्यावेळेस सतत पाऊस आला. त्यामुळे शेतातील व कापून गंजी मारून ठेवलेले सोयाबीन काळे पडले व अंकुर निघाले. तर अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला काळे डाग पडून खराब झाले. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन खराब होऊन नुकसान झाले.

परंतु गेलाय पंधरा दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे तूरपिकांवर अळीचा मारा होत आहे. वर विविध रोग पसरायला लागलेत. वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तूर पिकावर महागात महाग औषधी फवारणी करूनसुद्धा अळी व इतर रोगांवर कोणतेच परिणाम होत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहे.

झाडावरील तुरीच्या शेंगमध्ये दाणे न भरता फक्त पोकळ शेंग असल्याचेही बोलले जात आहे. शेतकऱ्यांना होणारे नुकसान पाहता याही वर्षी शेतकरी कर्जात बुडतील की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधी कापूस नंतर सोयाबीन आणि आता तूर या सर्वच पिकांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेदेखील वाचा

मृत्युनंतरही अनुभवला ‘त्याने’ प्रेमाचा ओलावा

हेदेखील वाचा

पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.