पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…

एकाची प्रकृती गंभीर, 2 जखमी तर 1 आरोपी फरार

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: ते दुचाकीने दारूची तस्करी करीत होते. भरधाव वेगाने जाणा-या त्यांना अचानक पुढे रस्त्यात पोलीस उभे दिसले. त्यांनी घाबरून गाडी पलटवली. मात्र त्या गडबडीत दोन्ही दुचाकींची आपसात धडक झाली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला तर दोघे किरकोळ जखमी झाले. एक आरोपी फरार झाला.

सविस्तर वृत्त असे की, आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी शिरपूर येथे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास वणीहून दोन दुचाकीस्वार पल्सर गाडीने (MH34-BA4402) (विना नंबर) डबल सिट चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे अवैधरित्या दारू घेऊन जात होते. दरम्यान शिरपूर येथे त्यांना पोलिसांची नाकेबंदी दिसली. त्यामुळे त्यांनी घाबरून मोटार सायकल पलटवण्याचा प्रयत्न केला. गाडी भरधाव असल्याने त्या दोन्ही गाड्यांची एकमेकास धडक झाली.

धडक होताच चारही व्यक्ती खाली पडले. त्यातील गणेश देवीदास पवार (21) हा गंभीर जखमी झाला. पंढरी बापुराव शिंदे (21) व प्रदीप शिवाजी खरात (18) हे दोघे किरकोळ जखमी झाले. तर राजू शिंदे याने घटनास्थळावरून पळ काढला. हे सर्व गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवाशी आहे. गंभीर जखमी असलेल्या गणेश देवीदास पवार याला उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

दारूचे पव्वे घेण्यासाठी लोकांची धाव
दोन्ही दुचाकीस्वार गाडीवर पिशवीत दारुच्या पव्वे आणत होते. अपघात होताच पिशवीतून दारुचे पव्वे खाली पडले. अपघात होताच पोलीस घटनास्थळी धावले. दरम्यान रस्त्यावर पडलेल्या पव्यावर डल्ला मारण्यासाठी काही लोकांनीही धाव घेतली. या प्रकऱणी पोलिसांनी देशी दारुच्या 8 पेट्या जप्त केल्या. 

चार ही आरोपींविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 279, 337 व महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 अ, ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोउनि धाबडे, प्रमोद जुनुनकर, सुगद दिवेकर, सुनील दुबे, गुणवंत पाटील, होमगार्ड प्रमोद मून व मोहन घागी यांनी केली.

हे पण वाचा:

पत्रकाराच्या अटकेविरोधात उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन

हे पण वाचा:

दारू तस्करांवर चारगाव चौकी येथे शिरपूर पोलिसांची कारवाई

Leave A Reply

Your email address will not be published.