सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे चार महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार व पटवारी यांनी ७ ब्रास रेती जप्त करून पोलीस पाटील यांना सुपूर्द केली. जप्त करण्यात आलेली रेती गावातीलच मुरली वैद्य व संसनवार यांनी पोलीस पाटील यांना न विचारता रोडच्या कामात वापरली.
चोरीची रेती वापल्यावरून तहसीलदार गिरीश जोशी यांनी पोलीस पाटील यांना आदेश देऊन रेती चोरट्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरिता पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे आदेश दिले. तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला, परंतु तक्रारकर्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने तलाठी यांना दुसरी तक्रार देऊन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल करून मुरली वैद्य व संसनवार यांना १४ डिसेंबर रोजी अटक केली व न्यायालयात हजर केले. अजून दोन आरोपी असून दोघांचा पाटण पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणात अवैध रेती आणणारा चोरटा कोण व कोणत्या गाडीने आणली याचाही शोध पोलीस घेत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा