शेतक-यांची लूट, स्पष्ट आदेश असतानाही जिनिंगची अवैधरित्या वसुली
कापूस उतराईचे 12 लाख रुपये जिनिंग कारखानदारांच्या खिशात?
जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयला कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून कापूस भरलेले वाहन खाली करण्यासाठी मजुरी घेऊ नये, असे सीसीआयचे स्पष्ट आदेश असताना वणी येथील अनेक जिनिंग फॅक्ट्रीमध्ये कापूस उतराईची मजुरीसाठी शेतकऱ्यांनी देण्यास भाग पाडले जात आहे. सीसीआय आणि जिनिंग प्रेसिंग कारखानदारांमध्ये झालेल्या करारानुसार वाहनातून जिनिंगमध्ये कापूस खाली करण्याची मजुरी जिनिंग संचालक भरणार आहे. मात्र जिनिंग कारखानदार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कापूस उतराईची मजुरी वसूल करत आहे. याबाबत
भारतीय कपास निगम (सीसीआय) ने वणी संकलन केंद्रावर 19 नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरू केली. वणी येथील 12 जिनिंग कारखान्यामध्ये आतापर्यंत सीसीआयने तब्बल 1 लाख 21 हजार क्विंटल कापूस खरेदी केल्याची माहिती आहे. जिनिंगमध्ये वाहनातून कापूस खाली करण्याकरिता प्रति वाहन 200 ते 250 रुपये मजुरी शेतकऱ्यांकडून वसूल केली जाते. सरासरी 20 क्विंटल प्रति वाहनांच्या हिशोबाने 6000 वाहन खरेदी केंद्रावर खाली करण्यात आले. तसेच खाली करण्यात आलेल्या वाहनांकडून सुमारे 12 लाख रुपयांची मजुरी वसूल करण्यात आल्याची शक्यता आहे.
खरेदी सुरू झाल्याचे एका महिन्यानंतर 16 डिसें. रोजी सीसीआयने जिनिंग प्रेसिंग व केंद्र प्रमुखांना पत्र पाठवून कापूस उतराईची रक्कम शेतकऱ्यांकडून घेण्यात येऊ नये, अशी सूचना केली होती. सीसीआयच्या आदेशानंतरही वणी येथील संकलन केंद्रावर कापूस उतराईची मजुरी शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येत आहे. अशी व्यथा शेतकरी विशाल बेलेकर व संदीप बलकी यांनी या प्रतिनिधीकडे मांडली.
याबाबत ‘वणी बहुगुणी’ने केंद्र प्रमुख अतुल जाधव यांना मोबाईलवर विचारणा केली असता, सोमवार पासून वसुली होणार नाही असे अजब उत्तर त्यांनी दिले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट लक्षात घेऊन ‘वणी बहुगुणी’ने सीसीआयच्या अकोला विभागीय महाप्रबंधक अजय कुमार व मार्केटिंग प्रबंधक मुंबई कार्यालय संजय पाणीग्रही यांच्याशीही मोबाईलवर संपर्क केला, मात्र त्यांनी त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
शेतकऱ्यांचे 12 लाख जिनिंग कारखानदारांच्या खिशात?
करारानुसार कापूस उतराईची रक्कम सीसीआय संबंधित जिनिंग फॅक्ट्रीला भुगतान करणार आहे. जिनिंग व्यापाऱ्यांनी एकीकडे शेतकऱ्यांकडूनही मजुरीची रक्कम वसूल केली, दुसरीकडे सीसीआयकडूनही मजुरीची रक्कम लाटणार आहे. त्यामुळे सीसीआयने 16 डिसेंबर पर्यंत खाली झालेल्या वाहनांची सुमारे 12 लाख रुपये जिनिंग व्यापाऱ्यांना देऊ नये. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
हे पण वाचा:
हे पण वाचा: