जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर वाहनातून कापूस खाली करण्याची मजुरी शेतकऱ्यांकडून घेऊ नये, असे आदेश भारतीय कपास निगम लि.ने 16 डिसें. रोजी निर्गमित केले आहे. परन्तु वणी येथील काही जिनिंगमध्ये अद्याप शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
यापुढे जर एकही शेतकरी कडून कापूस तोलाई व उतराईची पैसे घेतले तर संबंधित केंद्र प्रमुख व जिनिंग मालकाला ‘मनसे स्टाईल’ जाब विचारणार. अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी अकोला विभागीय महाप्रबंधक यांना पत्र पाठवून दिला आहे.
पत्राची प्रत खासदार बाळू धानोरकर, पालकमंत्री संजय राठोड, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सचिव/सभापत, कृउबास वणी, मारेगाव, झरी तसेच केंद्र प्रमुख यांनाही पाठविण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा:
शेतक-यांची लूट, स्पष्ट आदेश असतानाही जिनिंगची अवैधरित्या वसुली