3 जानेवारीला ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन
नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झाली सहविचार सभा
जब्बार चीनी, वणी: केंद्रसरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलममध्ये करण्यासाठी, वणी तहसील कार्यालयावर 3 जानेवारी 2021 रोजी ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक घेण्यात आली. आज 28 डिसेंबर रोजी नगरपरिषद येथे नगराध्यक्ष तारेंन्द्रजी बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली वणी शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची सहविचार सभा झाली.
स्वतंत्र कॉलममध्ये ओबीसी जातनिहाय जनगणनाची आवश्यकता विशद करुन होणाऱ्या फायद्यावर मार्गदर्शन करण्याचे कार्य, OBC (VJ/DNT/NT/SBC) जातनिहाय कृती समिती वणीचे मुख्य समन्वयक मोहन हरडे यांनी केले. तसेच समाजबांधवांच्या ओबीसी हिताच्या बाबींवर बोलताना राष्ट्रीय जनगणनेची पार्श्वभूमी, जनगणनेची आवश्यकता व महत्त्व स्पष्ट केले. दि .3 जानेवारीला वणी येथे होणाऱ्या ओबीसी विशाल मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
बैठकीत OBC( VJ/DNT/NT/SBC) जातनिहाय कृती समिती वणीचे प्रवीण खानझोडे, राम मुडे, इ. पदाधिकारी उपस्थित होते. कृती समितीच्या आवहानाला प्रतिसाद देत नगराध्यक्षांनी व उपस्थित सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी पूर्ण शक्तीने ओबीसी मोर्चात सामील होण्याचे जाहीर केले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा