पुलांच्या कामाजवळ असलेल्या वळणरस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालक त्रस्त

कच्च्या रस्त्यावर ठेकेदार पाणी का मारत नाही, जनतेचा सवाल

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन ते पाटण बोरी राज्यमार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्ता दुरुस्तीसह 17 पुलांचे कामसुद्धा सुरू आहे. पुलांच्या कामाकरिता रस्ता फोडून पुलाचे काम सुरू आहे. मार्गावरील वाहने जाण्याकरिता बाजूने खोदून माती टाकून बाजूने वळणरस्ते तयार करण्यात आले. बहुतांश वळणरस्त्यात मोठे दगड असल्याने मोठे वाहन, दुचाकी व बैलगाडी जाण्या-येण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.

वळण रस्त्यात मुरूम टाकल्याने दिवसभर धूळ उडून जनतेच्या डोळ्यांत जात आहे. ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तर जनतेला विविध आजार होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यावरील धूळ जनतेच्या किंवा वाहन चालकांच्या डोळ्यात उडून जाऊ नये, याकरिता वळणरस्त्यावर पाणी मारून धूळ दाबण्याचे काम ठेकेदाराचे असताना, एकही ठेकेदार रस्त्यावर पाणी मारत नसल्याचे दिसत आहे.

त्यामुळे ठेकेदाराबाबत जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसेच या सर्व कामांकडे वरिष्ठ अधिकारी व संबंधित अभियंताचे अर्थपूर्ण सबंध असल्यामुळे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी दिशाफलकसुद्धा लावण्यात आले नाहीत.

ठेकेदार यांनी वळणरस्ता बरोबर केला नसून झाडेझुडपे बरोबर साफ केली नसल्याने दुचाकी व चारचाकी चालकांना जवळ गेल्यानंतर वळण रस्ता दिसतो. त्यामुळे लहान मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे.

दुचाकी चालक वळण रस्त्याजवळ जाताच चालकांना जोरदार ब्रेक मारावे लागतात. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार स्लिप होऊन पडलेत. वाहनचालकांनी हटकल्यास एखाद्या वेळेस ठेकेदार पाणी मारतात. धूळ दिवसभर उडत असून तसेच वळणरस्त्याजवळील झाडे झुडपे साफ करून वळणरस्ता दुरून दिसणार असा करावा अशी मागणी वाहनचालक करीत आहे.

हेदेखील वाचा

वणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री

हेदेखील वाचा

दादासाहेब कन्नमवारांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर व्हावी

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.