तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणारे 5 पिकअप वाहनं जप्त

वणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 29 जनावरांची सुटका

0

जितेंद्र कोठारी, वणी: वरोरा येथून गोवंश भरुन कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 5 पिकअप वाहन वणी पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 8 तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून 29 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास वरो-यावरून तेलंगणात गोवंशाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना खबरीकडून मिळाली. त्या माहितीवरून डीबी पथकाने रविवार संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास वरोरा मार्गावर नायगाव फाट्याजवळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वरोरा मार्गे येत असलेले बोलेरो पिकअप मालवाहू क्र. ( MH 27 X1189) (MH34 AB 2478) (MH30 BD 2330) ( MH32 AJ 1193) व अशोक लेलेंड मिनिडोर क्र. (MH34 AV 0937) हे वाहनं येताना दिसले.

पोलिसांनी या वाहनाची थांबवून तपासणी केली असता या वाहनात 29 गोवंश कोंबून भरलेले आढळून आले. पोलिसांनी पाचही वाहन चालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर जनावरे कत्तलीसाठी वरोरा येथून भरुन हैद्राबाद येथे नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी पिकअप वाहन चालकांसह 8 जणांना अटक करून वाहनात भरलेल्या जनावरांची सुटका केली.

या प्रकरणी अफजल बेग (34) रा.कायर, सैयद इमरान (24) रा. बेला, जि. आदीलाबाद, सचिन महादेव थेरे (37) रा. टुंड्रा ता. वणी, शेख कलीम शेख हकीम (34), रा. धोत्रा शिंदे, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला, भोलाराम सुरेश पडोळे (25) रा. डोर्ली ता. वणी, नीलेश मधुकर आसुटकर (37) रा. डोर्ली ता. वणी, नंदकुमार शिवसुंदर तिवारी (46) रा. वरोरा जि. चंद्रपूर व रमेश शालीक पेंदोर (37) रा. टुंड्रा ता. वणी अशा 8 जणांना अटक केली.

पोलिसांनी तस्करांकडून 29 नग गोवंश ज्याची किंमत 7 लाख 30 हजार तसेच जनावर वाहतूक करणारे 5 मालवाहु वाहन किंमत 19 लाख 5 हजार असा एकूण 26 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना रासा येथील गुरु माऊली गोशाळेच्या सुपूर्द करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 कलम 5(अ) 9, प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 कलम 11 (1) (ए) (बी)(इ)(एफ)(एच)(आय)(के) सह मोवाका क्र. 130 (3)/177 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांचे मार्गदर्शनात पो. नि. वैभव जाधव, डीबी पथकाचे पोउनि गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोळे, रत्नपाल मोहोड, पंकज उंबरकर, अमित पोयाम, दीपक वांडर्सकर यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘वणी बहुगुणी’ची जाहिरात स्किम जाहीर

हे देखील वाचा:

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे

Leave A Reply

Your email address will not be published.