पत्रकारांनी अनाथ विद्यार्थ्यांसोबत साजरा केला पत्रकारदिन
ग्रामीण पत्रकार संघ मारेगावचा उपक्रम
नागेश रायपुरे, मारेगाव: ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने तालुक्यातील जळका येथील ग्रामीण मुक्ती ट्रस्ट अंतर्गत लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील अनाथ विद्यार्थी सोबत त्यांना भोजन व मास्क सॉनिटायझर वाटप करून अनाथ विद्यार्थ्यां सोबत मराठी वृत्तपत्राचे आद्यजनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारदिन साजरा केला.
सर्वप्रथम ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीबा पोटे, तालुका अध्यक्ष माणिक कांबळे, कार्याध्यक्ष अशोक कोरडे यांनी पत्रकारांचे महत्त्व विशद करून येथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना काही मदतीचे संघटनेकडून आश्वासनसुध्दा देण्यात आले. दरम्यान ग्रामीण पत्रकार संघटनेचे सचिव नागेश रायपुरे व कार्याध्यक्ष अशोक कोरडे यांनी सादर केलेल्या कराओके ट्रॅक हिंदी, मराठी गीतातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
दरम्यान सगळ्या विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले. मास्क वाटप करण्यात आले. ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे मारेगाव शहरात सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमावर आधारीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावर्षी प्रथमच तालुक्यातील जळका येथील ग्रामीण मुक्ती ट्रस्ट अंतर्गत लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील अनाथ विद्यार्थ्यांसोबत थेट सवांद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष देवेंद्र पोल्हे यांनी केले. आभार कु.रोहनकर हिने मानलेत. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्योतिबा पोटे, तालुका अध्यक्ष माणिक कांबळे, सचिव नागेश रायपुरे, कार्याध्यक्ष अशोक कोरडे, कोषाध्यक्ष उमर शरीफ, सहसचिव दिलदार शेख, प्रसिद्धी प्रमुख श्रीधर सिडाम, रमेश झिंगरे, सुरेश नाखले, दीपक पवार आदींनी परिश्रम घेतले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा