नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील जळका येथील शेतकरी बाळू उर्फ हेमंत जानराव मोघे (55) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि यावर्षी सोयाबीन व कापूस पिकाचा बसलेला फटका या धक्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेमंतकडे स्वत:च्या नावाची आठ एकर शेती तर वडिलांच्या नावाने आठ एकर शेती होती. परंतु हेमंतच्या नावावर व वडिलांच्या नावे दोघांचे मिळून सहकारी बँकेचे दीड लाख रुपयांचे थकीत कर्ज होते. या वर्षी सोयाबीन व कापूस पिकाला जोरदार फटका बसल्याने गेल्या काही दिवसांपासून हेमंत चिंताग्रस्त होते.
अनेकांनी त्यांना समजावून हिंमत देण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या काही दिवसापांसून ते कमी बोलत एकांतात राहण्याचा प्रयत्न करीत होते. अशातच 11 जानेवारीच्या रात्री घरातील मंडळी झोपून असताना हेमंतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी कुटुंबातील सदस्य झोपेतून उठल्यावर हा प्रकार उघडकीस आला तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच राहुल गांधींच्या भेटीने आणि कलावती बांदुरकर यांच्या विधानसभा निवडणूक लढविल्याने जळका गाव चर्चेत आले होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा