….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर

● 'या' नव्या शॉर्टकटने जवळपास अर्धे अंतर होईल कमी

0

जितेंद्र कोठारी, वणी : वणी निळापूर ब्राह्मणी मार्गावर जुनाडा गावालगत वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम युद्ध स्तरावर सुरु आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर वणी ते भद्रावतीचे अंतर फक्त 16 किमी राहणार आहे.
या नव्या शॉर्टकटने जवळपास अर्धे अंतर कमी होईल. तसेच पुलावरून रहदारी सुरु झाल्यानंतर या रस्त्याला महत्त्व येणार आहे.

जिनिंग प्रेसिंग व इतर कारखाने असल्यामुळे निळापूर मार्ग औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. परंतु आता या मार्गावर निवासी ले आऊट व प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार वाढत आहेत. ग्राहकांच्या मागणीमुळे 100 ते 200 रुपये स्क्वेअर फूट जमिनीचे भाव 400 ते 500 रुपये स्क्वे. फूटापर्यंत पोहोचले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर अंतर्गत केंद्रीय मार्ग निधीतून वर्धा नदीवर जुनाडा ते तेलवासा दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. 22 कोटींच्या निधीतून तब्बल 250 मीटर लांबीच्या पुलाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यासाठी 700 मीटर भूसंपादनाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी वणी यांना पाठविण्यात आल्याची माहिती आहे. पुणे येथील टीएनटी कंपनीला कामाचा कंत्राट देण्यात आला आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत भूसंपादनचे कार्य पूर्ण होऊन पुलावरून वाहतूक सुरु होण्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर क्र. 1 चे कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांनी वणी बहुगुणीला दिली.

हेदेखील वाचा

एका ‘चमत्काराने’ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा टॅक्स जमा

 

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.