सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या

मारेगाव तालुक्यात पुन्हा आत्महत्या

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील सिंदी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ता.१० जानेवारीला घडली. मागील वर्षात आत्महत्यांची मालिका सुरु असताना ती खंडित न होता नवीन वर्षात पुन्हा आत्महत्यांची मालीका सुरुच आहे.

तालुक्यातील सिंदी येथील ३८ वर्षीय शंकर कवडुजी गायकवाड यांनी सिंदी येथील राहत्या घरी रात्री दहा वाजताचे दरम्यान कीटकनाशक प्राशन केले. मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ वणी येथे हलविले.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतकाच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

हेदेखील वाचा

जळका येथे शेतकऱ्याची आत्महत्या

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...