नागेश रायपुरे, मारेगाव: येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीची तालुक्यात रणधुमाळी सुरू आहे. अश्यातच तालुक्यातील कुंभा ग्राम पंचायत निवडणुकीच्या रणांगणात ग्राम परिवर्तन पॅनलचे अरविंद ठाकरे हे त्यांच्या पॅनल सह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गावाचा विकास हेच ध्येय राहील असा विश्वास त्यांनी वणी बहुगुणीजवळ व्यक्त केला आहे.
सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यानिमित्त ‘वणी बहुगुणी’ गावागावात जाऊन पॅनल आणि उमेदवारांशी संवाद साधत आहे. यानिमित्त वणी बहुगुणीने कुंभा येथील समाजिक कार्यकर्ते अरविंद वसंत ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या ग्राम परिवर्तन पॅनल बाबत आणि पॅनलच्या जाहीरनाम्याबाबत माहिती दिली.
कुंभा येथे तीन प्रभाग आहेत. यात प्रभाग क्र.1 मध्ये अनु.जमाती मधून राजकुमार खुशाल चांदेकर, ना.मा.प्र.मधून गजानन मारोती ठाकरे, सर्वसाधारण स्त्री मधून सुचिता अनंता महाजन उभे आहेत. प्रभाग क्र.2 मध्ये सर्वसाधारण मधून अरविंद वसंत ठाकरे, ना.मा.प्र.स्त्री मधुन अश्विता अरविंद ठाकरे, सर्वसाधारण स्त्री साठी गंगा विनोद ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्र.3 मध्ये सर्वसाधारण साठी विनायक महादेव गाऊत्रे, सर्वसाधारण स्त्री मधून सुनीता अशोक आवारी तर सर्वसाधारण स्त्री मधून माया मोतीराम पडोळे उभ्या आहे. अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वात हे 9 उमेदवार ग्रा.प.निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
ग्राम परिवर्तन पॅनलचे प्रमुख अरविंद ठाकरे यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते परिसरात ओळखले जातात. मात्र ते राजकारणापासून काहीसे अलिप्त राहतात. याबाबत आम्ही त्यांना विचारणा केली.
गावाचा चेहरामोहरा बदलवण्यासाठीच राजकारणात: अरविंद ठाकरे
मला राजकारणाचा कोणताही गंध नाही. माझे क्षेत्र सामाजिक आहे. मात्र सर्वांगीण विकासासाठी राजकारण हाच पर्याय असल्याने मी ग्राम परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करत आहे. माझ्या सामाजिक कार्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मला पाडण्यासाठी विरोधकही एकत्र येत आहे. मात्र माझ्या सामाजिक कार्याच्या अनुभवामुळे सर्वसामान्य गावकरी आमच्या सोबत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच माझे पॅनल काम करत आहे. जर कुंभा वासीयांनी यावेळी एक संधी दिली तर मी गावाचा चेहरा मोहरा बद्दलविल्या शिवाय राहणार नाही.
– अरविंद वसंत ठाकरे, ग्राम परिवर्तन पॅनल
हे देखील वाचा: