गिरीश कुबडे, वणी: झरी गाव तालुका ठिकाण असुन झरीला जाण्यासाठी जो रस्ता आहे. त्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुपवस्था झालीये. हा रस्ता आधीच अरुंद आहे त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहणाला जायला अडथळा होतो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. याआधी या मार्गावर छोटे मोठे अपघात झाले.
विशेष म्हणजे आमदार यांच्या मुळ गावाकडील ही परिस्थिती आहे. झरी तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्व शासकीय कार्यालय तिथे आहे. बोपापूर, अडकोली, इत्यादी गावावरून झरीला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होतो. शिवाय परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या मार्गाने ये जा करत असतात. त्यामुळे रस्त्याचा पदर वाढवावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.