सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अडेगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदी सीमा लालसरे तर उपसरपंच पदी भाजप गटाचे भास्कर सूर निवडून आले आहे. सीमा लालसरे या मंगेश पाचभाई गटाच्या आहेत. मंगेश पाचभाई गट व भाजपने 8 जागांवर विजय मिळवला होता. मात्र सरपंचपदाच्या निवडणुकीआधी फाटाफुट होऊन दोन गट पडले व निवडणुकीत चुरशी निर्माण झाली होती. अखेर सीमा लालसरे यांनी बाजी मारली.
आज सोमवारी दिनांक 22 फेब्रुवारीला अडेगाव येथील सरपंचपदाची निवड ग्रामपंचायत मध्ये पार पडली. 12 वाजता सरपंच व उपसरपंच पदाकरिता अर्ज दाखल करण्यात आले. अडेगाव ग्रामपंचायतीमध्ये 11 सदस्य आहेत. यात दोन गटाला प्रत्येकी 4 व एका गटाला 3 मत मिळाले. मंगेश पाचभाई गटाकडून सीमा दत्तात्रय लालसरे तर दुस-या गटाकडून माया अरुण हिवरकर यांनी सरपंचपदासाठी अर्ज भरला.
दोन्ही गटाला समान मत असल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीने पदाची निवड करण्यात आली. त्यात सीमा लालसरे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली. तर उपसरपंचपदाकरिता तीनही गटातून प्रत्येकी 1 असे 3 व 1 अतिरिक्त असे 4 अर्ज भरण्यात आले होते. यात 4 मते घेऊन भास्कर सूर हे उपसरपंचपदी विराजमान झाले.
मंगेश पाचभाई गटाने भाजपा सोबत हात मिळवणी करून ही निवडणूक लढविली होती. त्यांच्या गटाचे 5 सदस्य निवडून आले. भाजपचे संजय दातरकर, माजी सरपंच अरुण हिवरकर यांच्या गटाला 3 असे एकूण 8 सदस्य निवडून आले. त्यांना बहुमत प्राप्त झाले होते. तर महाविकास आघाडी पॅनलला 3 जागेवर समाधान मानावे लागले.
फाटाफुटीने सरपंचपदासाठी चुरस
भाजप व पाचभाई गटात सरपंच पदावरून कलह निर्माण झाला व फूट पडली. सरपंच पदाकरिता महाविकास आघाडी सह भाजप गट व पाचभाई गटाकडून अर्ज भरण्यात आले. पाचभाई व हिवरकर गटाकडे 4-4 सदस्य असल्याने ईश्वर चिठ्ठी द्वारे सरपंच पदाची सोडत करण्यात आली त्यात पाचभाई गटाची सीमा लालसरे या सरपंच म्हणून निवडून आल्या.
पाचभाई गटातील महिला सरपंच पदी विराजमान झाली असली तरी बहुमत नसल्याने सहा महिन्यात पाचभाई गटाला बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा: