कोलगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अभीषा राजेंद्र निमसटकर

उपसरपंचपदी प्रदीप वासाडे, महाविकास आघाडी पॅनलने मारली बाजी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी पॅनलने बाजी मारली आहे. 9 सदस्य असलेल्या या निव़डणुकीत सरपंचपदी अभीषा राजेंद्र निमसटकर तर उपसरपंचपदी प्रदीप नानाजी वासाडे हे अविरोध निवडून आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलने बहुमत मिळवले होते.

कोलगाव ग्रामपंचायतीमध्ये 3 प्रभागात एकूण 9 जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. महाविकास आघाडी पॅनलने प्रभाग 2 व प्रभाग 3 मध्ये 6 जागांसाठी निवडणूक लढवली होती. यात त्यांना पाच जागांवर विजय मिळवला होता. प्रभाग क्रमांक 3 येथे अनुसुचित जाती या राखीव जागेवर नवनिर्वाचित सरपंच अभीषा निमसटकर यांनी 47 मतांनी विजय मिळवला होता. तर प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण या जागेवर नवनिर्वाचित उपसरपंच प्रदीप वासाडे यांनी 100 पेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता.

या निवडणुकीत 9 पैकी 5 जागा महाविकास आघाडी पॅनलला मिळाल्या तर त्यांच्या सहयोगी पॅनलला 2 जागा मिळाल्या होत्या. 7 जागांच्या बहुमतांमुळे महाविकास आघाडी पॅनल सत्तेत येण्याचे आधीच निश्चित झाले होते. आज झालेल्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी 9 ग्रामपंचायत हजर होते. सरपंचपद हे अनुसुचित जाती महिला गटासाठी राखीव होते. सरपंचपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला. तर उपसरपंचपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक अविरोध पार पडली.

ग्रामपंचायतीमध्ये अश्विनी चेतन आवारी, रवीता प्रदीप अवताडे, रविंद्र बंडू आत्राम, गुरुदास घोटकर, जया अमोल जुनगरी, वर्षा दुश्यंत निब्रड, नंदा सुरेश खिरटकर हे सदस्य राहणार आहेत. महाविकास आघाडी पॅनलने ही निवडणूक संजय पारखी व राजू निमसटकर यांच्या मार्गदर्शनात लढवली होती. त्यांना गावक-यांनी साथ दिली. 

कोलगाववासियांचा विश्वास सार्थ करून दाखवेन – सरपंच
कोलगाव ग्रामपंचायत ही राजकीय परंपरा लाभलेलं गाव आहे. मात्र विकासाच्या बाबतीत कोलगाव अद्यापही मागेच आहे. गावाची लोकसंख्या अधिक असूनही साधी स्मशानभूमी गावाला नाही. गावात चारचाकी सोडा दुचाकीनेही निट फिरता येत नाही. विकासासाठी पुरेसा निधी देखील गावाला मिळाला होता मात्र रस्त्यापासून ते पाण्यापर्यंत कोणतीही योजना गावात नीट राबवली गेली नाही. त्यामुळे लोकांनी परिवर्तन करीत एक संधी मला दिली त्याबाबत गावक-यांची खूप खूप आभारी आहे. कोलगाव वासियांनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करून दाखवेन.
– अभीषा निमसटकर, नवनिर्वाचित सरपंच कोलगाव

हे देखील वाचा:

दुचाकीची उभ्या ट्रकला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अडेगाव ग्रामपंचायतीचा ईश्वर चिठ्ठीने फैसला

 

Leave A Reply

Your email address will not be published.