ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघात, दोन जखमी

मुकुटबन येथील साईबाबा जिनिंग जवळील घटना

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील साईबाबा जिनिंग समोर आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरुणाचा पाय मोडला तर एक तरुण जखमी झाला आहे. दरम्यान जखमींना मदत करण्याऐवजी अनेक लोक मोबाईलवर फोटो काढण्यात मशगुल असताना दिसून आले. अखेर पंचर ऑटोच्या मदतीने जखमींना उपचारासाठी नेण्यात आले.

शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मुकुटबन येथून मांगली येथील शैलेश जीवनदास टिकले (24) व प्रज्योत मधुकर वाघाडे (25) हे दोघे आपली कामे आटोपून आपल्या दुचाकीने (MH29 AJ 9915) घरी (मांगली) परत जात होते. मुकुटबन-पाटण मार्गावरील साईबाबा जिनिंगमधून बाहेर निघत असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. एकाचा पाय तुटला तर एक जखमी झाला.

अपघाताची माहिती मुकुटबन शहरात पसरताच बघ्यांची गर्दी उसळली. परंतु जखमींना दवाखान्यात उचलून घेऊन जाण्या ऐवजी मोबाईलवर फोटो काढणाऱ्याची संख्या जास्त होती. गावातील व मांगली येथील काही सुज्ञ लोकांनी चारचाकी ऑटो थांबविण्याचा प्रयत्न केले. परंतु कुणीही थांबले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता.

अखेर मारोती राजूरकर यांनी पंचर अवस्थेत उभा असलेला ऑटो आणला. त्यात जखमींना टाकून मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारोती राजूरकर यांनी जखमी तरुणांकरिता केलेल्या मदतीची परिसरात प्रशंसा होत आहे. जखमींना मुकुटबन येथून वणी येथे रेफर करण्यात आले आहे. अपघात झालेला ट्रॅक्टर हा लिंगटी येथील असल्याची माहिती असून ट्रॅक्टर व ट्रोलीवर नंबर नव्हता. त्यामुळे सदर ट्रॅक्टर कुणाचा आहे याबाबत माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेटच्या संशयावरून नागरिकांची धाड

आज शहरात कोरोनाचे 2 रुग्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.