दिगांबर गवळी यांना सेवानिवृत्ती बद्दल निरोप

सेवेबाबत करण्यात आला गौरव

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील स्व.लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील मुख्याध्यापक दिगांबर बोधनराव गवळी हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या बद्दल त्यांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे व्यवस्थापक अतुल मोघे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एस.एन.नहाते ए.यू.मोघे डी. एम.पोल्हे उपस्थीत होते. उपस्थीत मान्यवरानी मुख्याध्यापक गवळी यांच्या कार्याबद्दल व कर्तुत्वा बद्दल गुणगौरव करण्यात आला.

निरोप समारंभा बद्दल बोलताना सर्वानी केलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त करुन सगळ्यांच्या मदतीने जबाबदारी पार पाडू शकलो अशी कृतज्ञता व्यक्त केली

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासहेब मानकर,संचालन डी.एम.पोल्हे.तर उपस्थितांचे आभार अमित मोघे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल आसेकर रंजित भगत आणि त्यांच्या सहका-यानी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

पाटण येथे पोलीस स्टेशनच्या जवळच मटका पट्टी सुरू

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज आढळलेत 9 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.