तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज आढळलेत 9 रुग्ण

नगरपालिकेची 37 व्यक्तींवर कारवाई, शहरात संचारबंदी सुरू

0

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक दिसून आला. आज कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आलेत. यातील प्रगती नगर, शास्त्रीनगर व चिखलगाव येथे प्रत्येकी 2 तर सानेगुरुजी नगर, ढुमेनगर व भालर टाऊनशीप येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 35 आहेत. दरम्यान कोरनाचा वाढू नये यासाठी प्रशासनाची कारवाई सुरूच आहे. आज तब्बल 37 व्यक्तींवर मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्याने दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजेपासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली.

आज 40 संशयीतांचे यवतमाळ येथून रिपोर्ट प्राप्त झालेत. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 33 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 33 रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 31 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. याशिवाय आज 5 कोरोनामुक्त सुटी देण्यात आली. आजच्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 35 झाले आहेत. यातील 6 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 14 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 15 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

आज आलेल्या रुग्णांवरून 20 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1239 रुग्ण आढळून आलेत. यातील 1179 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

संध्याकाळी 5 वाजेपासून शहरात संचारबंदी
कोरोनाचे रुग्ण वाढू नये यामुळे यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संध्याकाळी 5 वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी उद्याचा पूर्ण दिवस व रात्र राहणार. सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत ही संचारबंदी उठणार आहे. आज शनिवारी असल्याने बाजारपेठ बंद होती. त्यामुळे शहरात गर्दी कमीच दिसून आली. संध्याकाळी 5 नंतर प्रशासनाची गाडी फिरून नागरिकांना संचारबंदीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

आज 37 व्यक्तींवर कारवाई
लॉकडाऊनचे नियम तोडणा-यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. आज 37 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 4 व्यक्तींवर मास्क न वापरल्याने तर 32 व्यक्तींवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने कारवाई करण्यात आली. तर एका व्यापारी प्रतिष्ठानावर कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणा-यांना प्रत्येकी 500 रुपये तर असा 2000 रुपये तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणा-यां 32 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये तर दुकानाकडून 2 हजार रुपये असा एकूण 10400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेटबाबत नागरिक संतप्त तर पोलीस प्रशासन उदासिन (भाग 7)

ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघात, दोन जखमी

Leave A Reply

Your email address will not be published.