जितेंद्र कोठारी, वणी: पर्यावरणाच्या नावावर एकीकडे करोडो रुपये खर्च करून वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. वणी यवतमाळ मार्गावर साईमंदिर ते चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग गेट पर्यंत दुभाजकसह सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे. सहाशे मीटर लांबीच्या या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूने असलेल्या तब्बल 38 कडुनिंबाच्या झाडांची निर्दयपणे कत्तल करण्याचे कार्य सुरु आहे. शंभरवर्षेहून अधिक जुन्या झाडांच्या मुळावर लॉकडाउनच्या दिवशीही निर्दयपणे आरी फिरविण्यात आली. त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत वणी ते कायर पुरड या रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. याच कामांतर्गत मुकुटबन रोड टी प्वाइंट ते साई मंदिर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने ड्रेनेजसह काँक्रीट रोडचे बांधकाम होणार आहे. रस्ता रुंदीकरणच्या कामात मोठे वृक्ष व विद्युत पोलचा अडथळा असल्यामुळे कंत्राटदारांनी संबंधित विभागाला पत्र देऊन विद्युत खांब,डीपी व वृक्ष हटविण्याची मागणी केली होती.
वर्षोनुवर्षे सावळी व जीवनदायिनी ऑक्सिजन देणाऱ्या या भल्यामोठ्या वृक्षांच्या कातलीमुळे सर्व सामान्य नागरिकांचे मन हेलावून टाकले. मात्र शहराची महत्वाची संपत्ती असलेल्या वृक्षांचे कत्तल होत असताना एकही पर्यावरण प्रेमी किंवा संस्थेनी प्रशासनाकडे आक्षेप नोंदविले नाही.
हे देखील वाचा:
सेक्स रॅकेटबाबत नागरिक संतप्त तर पोलीस प्रशासन उदासिन (भाग 7)