चिखलगाव ठरतोय हॉटस्पॉट, आज तालु्क्यात 8 रुग्ण

ग्रामीण भागात वाढतोय कोरोना

0

जब्बार चीनी, वणी: आज कोरोनाच्या रुग्णसंख्ये पुन्हा अचानक उसळी घेतली आहे. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. आज बुधवारी दिनांक 3 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले. यातील केवळ एक रुग्ण वणीतील आहे तर इतर ग्रामीण भागातील आहे. चिखलगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. आज चिखलगाव येथे 4 तर भालर टाऊनशिप, झोला, बोटोणी व वणीतील प्रगतीनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 46 आहेत.  

आज 19 संशयीतांचे यवतमाळ येथून रिपोर्ट प्राप्त झालेत. यात 6 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 13 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 16 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 2 पॉजिटिव्ह आढळून आले तर इतर व्यक्ती निगेटिव्ह आलेत.

सध्या तालुक्यात 46 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 8 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 22 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 16 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1252 रुग्ण आढळून आलेत. यातील 1181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

Leave A Reply

Your email address will not be published.