तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण, ग्रामीण भागात वाढतोय कोरोना

2 मंगल कार्यालयावर प्रशासनाची कारवाई

0

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रविवारी दिनांक 7 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरात दोन तर तीन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शास्त्रीनगर व सर्वोदय चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर भालर टाऊनशीप, कोरंबी मारेगाव व झोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 27 आहेत. दरम्यान रविवारी संचारबंदी होती. मात्र मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ सुरू होते. शहरात सुरू असलेल्या 2 मंगल कार्यालयावर प्रशासनाने कारवाई केली.

रविवारी 54 संशयीतांचे यवतमाळ येथून रिपोर्ट प्राप्त झालेत. यात 5 व्यक्ती आलेत तर 49 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 45 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यातील सर्व व्यक्ती निगेटिव्ह आल्यात.

सध्या तालुक्यात 36 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 2 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 17 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 8 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1262 रुग्ण आढळून आलेत. यातील 1210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

दोन मंगल कार्यालयावर कारवाई
संचारबंदीत लग्नकार्य व इतर कार्यास बंदी असताना लग्न समारंभा आयोजित केल्याबाबत शहरातील दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. यातील एक कारवाई ही नांदेपेरा रोडवरील तिरुपती मंगल कार्यालय तर दुसरी कारवाई छोरीय टाऊनशीप येथील विनायक मंगल कार्यालयावर करण्यात आली. तिरुपती मंगल कार्यालयात 100 पेक्षा अधिक व-हाडी आढळून आले. तर विनायक मंगल कार्यालयात 300 पेक्षा अधिक व-हा़डी सहभागी होते. प्रशासनाचे अधिकारी येण्याची माहिती कळताच अर्ध्याअधिक लोकांना बाहेर काढून मंगल कार्यालयाचा गेट बंद करण्यात आला. या कारवाईत मंगल कार्यालयावर प्रत्येकी 2 हजारांचा दंड आकारण्यात आला.

हे देखील वाचा:

नदीवर पोहण्यास गेलेला तरुण बेपत्ता

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.