सुशील ओझा, झरी: जागतिक महिला दिनी कृषिपंप योजनेत भाग घेतलेल्या महिलांचा महावितरण तर्फे सत्कार करण्यात आला. 8 मार्च रोजी “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून महावितरण झरी उपविभागातर्फे “कृषीपंप वीज जोडणी धोरण-20” अंतर्गत लाभान्वित एकूण 11 महिलांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यातील सहा महिला कृषीपंप धारक मंजुषा पुरुषोत्तम गोहोकार रा रासा, सुधादेवी शरदराव चौधरी रा. बाबापुर, सरस्वती पुरुषोत्तम नगराळे रा. घोन्सा, लावण्या किष्टु अडपावार रा. पाटण, लक्ष्मीदेवी रामारेड्डी म्यानरवार रा. पाटण व किरण तुकाराम नैताम रा. झरी ह्यांनी वीज बील थकबाकी मधील विलंब आकार, व्याज व उरलेल्या मुळ थकबाकी मधील पन्नास टक्के रक्कम वगळून योजनेअंतर्गत भरावयाची रक्कम एक रकमी भरुन आपले वीज बील कोरे केले त्यामुळे प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
पाच महिला गीताबाई प्रविण विधाते रा. मार्की बु, कल्पना सुभाष खांडलकर रा. कोरंभी (मा.) मीराबाई शंकरराव मडावी रा. पिंप्रड, लक्ष्मीबाई नेहरु माशटवार रा. राजुर व रमाबाई व्यंकटी तोटावार रा. पाटण ह्यांनी कृषीपंप वीज जोडणी करिता डिमांड भरुन त्यांच्या शेतातील विहीर/बोअर चे अंतर अस्तित्वात असलेल्या लघुदाब वाहिनी पासुन 30 मीटर च्या आत असल्यामुळे त्यांना त्वरित वीज जोडणी देण्यात आली. त्यानिमित्य प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार केला.
उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड, सहाय्यक अभियंता लटारे, नंदलवार,मालके व कर्मचारी जया मंचलवार, देवगडे, कापसे, गोवारदीपे, सुरपाम,ब्राम्हणे, ताजणे इ नी सत्कार केला.
हे देखील वाचा: