वणीत जागतिक वन व चिमणी दिनानिमित्त वृक्षारोपण

स्माईल फाउंडेशनचा उपक्रम

0

विवेक तोटेवार, वणी: आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त व जागतिक चिमणी दिनानिमित्त शनिवारी दिनांक 20 मार्च रोजी स्माईल फाउंडेशन तर्फे शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या बाजूला व शासकीय मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तीन लिंबाची झाडे लावण्यात आली तसेच या झाडांना ट्री गार्ड लावण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला स्माईल फाउंडेशनचे संस्थापक सागर जाधव, विनम्र कुईटे, निखिल मुत्तलवार, सचिन जाधव, आदर्श दाढे, शुभम भेले, अक्षय दाढे, सारंग चिंचोलकर यांच्यासह स्माईल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. स्माईल फाउंडेशन ही परिसरातील एक परिचित संस्था (NGO) असून शिक्षण, आरोग्य व पर्यावरण इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्य करीते. वर्षभर या संस्थेद्वारा विविध सामाजिक उपक्रम सुरू असते.

हे देखील वाचा:

मायलेकीला एकाच चितेवर अग्नी, मारेगाव गहिवरले

दिवसाधवळ्या 45 लाखांची लूट, ब्राह्मणी फाट्याजवळील घटना

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.