विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्राचे शुक्रवारी दिनांक 19 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हा आरोग्य समिती सदस्य बंडू चांदेकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ अभिनय कोहळे, डॉ प्रवीण बोडखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य परशुरामभाऊ पेंदोर, पंचायत समिती सदस्य वर्षा पोतराजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर ज्येष्ठ नागरीकांना कोवीडची लस देण्यात आली. ज्या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी नाही अशा नागरिकांची नोंदणीही यावेळी करण्यात आली. आरोग्य सहाय्यक मारोती पंधरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तर वर्षा पोतराजे यांनी ही लस पुर्णपणे सुरक्षीत असून नागरिकांनी ही लस घ्यावी असे आवाहन परिसरातील नागरिकांना केले.
कार्यक्रमाला सरपंच जगदीश बोरपे, उपसरपंच मोहित चचडा, ग्रा.प. सदस्य महेश वाढीवा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी MPW प्रवीण आस्वले, LHV रोशनी बागडे, ANM कल्पना थुल, ANM आरती आठवले यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा: