सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे एका धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री सुरू होती. या प्रकरणी एसडीपीओ पथकाने धाड टाकून दारूसाठी जप्त केला आहे. या छाप्यात विदेशी दारू व बिअर आढळून आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या मुख्य द्वारा जवळ गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून MH 29 नावाने ढाबा सुरू करण्यात आला. धाब्यावर अवैध रित्या खुलेआम दारू विक्री सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकांना माहिती मिळाली. यावरून एसडीपीओ पथकाने बुधवारी दिनांक 24 मार्च रोजी रात्री या धाब्यावर छापा मारला.
दरम्यान धाब्याची झडती घेतली असता फ्रिजजवळच्या पाण्याच्या कॅनमध्ये 180 एमएलच्या 54 शिश्या ज्याची किंमत 2802 रुपये व फ्रीजमध्ये 500 एमएलच्या बिअरच्या 13 कॅन ज्याची किंमत 1820 रुपये असा एकूण 3622 रुपयाचा दारू साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अमोल बरशेट्टीवार (30) रा. मुकुटबन व आणखी एका तरुणास अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही एसडीपीओ संजय पूजजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वानखेडे, आशिष टेकाडे, रवी इसनकर, संतोष कालवेलवार यांनी केली.
हे देखील वाचा:
वेश बदलून जुगार अड्ड्यावर धाड, शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई