सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे घरी विक्रीसाठी दारुचा अवैधरित्या साठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक करण्यात आली. मंगळवारी दिनांक 30 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता व रात्री 8.45 वाजता ही कारवाई करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात सुमारे साडे 11 हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. निर्मला कामतवार (45) व कलावती गोहणे (55) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुकुटबनचे ठाणेदार यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी अवैध दारूविक्रीबाबत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अडेगाव येथे काही घरून अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी गावातील निर्मला कामतवार या महिलेच्या घरी संध्याकाली 7 वाजताच्या सुमारास छापा मारला. यावेळी घराची झडती घेतकी असता नायलॉनच्या बोरीमध्ये देशी दारुच्या 141 नीप आढळून आल्यात. ज्याची किंमत 7 हजार 755 रुपये इतकी आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.
त्यानंतर पोलिसांच्या चमुने गावातीलच दोन तीन घरांची पुन्हा झडती घेतली असता त्यांना दारू आढळून आली नाही. त्यानंतर या घरापासूनच काही अंतरावर असलेले कलावती गोहणे (55) हिच्या घरी दारू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी रात्री सुमारे 8.45 मिनिटांनी वाजता गोहणे हिच्या मालकीची पानटपरी व घराची झडती घेतली असता घरात 70 देशी दारूच्या नीप आढळून आल्यात. ज्याची किंमत 3 हजार 850 रुपये आहे.
पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करून ठाण्यात आणले. या दोन्ही आरोपींवर अवैधरित्या दारू साठा केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार मोहन कुडमेथे व संतोष मडावी करीत आहे.
हे देखील वाचा: