मारेगावात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण

ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना व्हायरस च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मारेगाव तालुक्यात दिवसे दिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवाला नुसार मंगळवारी मारेगाव शहरात पुन्हा 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यातील आता एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 18 वर पोहचली आहे.

फेब्रुवारी पासून चालू झालेल्या कोरोना व्हायरस च्या दुसऱ्या लाटेत आज परंत रॅपीड व आरटीपीसी आर टेस्ट द्वारे जवळपास 103 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. आरोग्य विभागाला मिळालेल्या आज अहवाल नुसार मारेगाव शहरात 3 पॉझिटिव्ह आढळले आहे.

ऍक्टिव्ह असलेल्या 18 रुग्णा पैकी कोविड सेंटर वर उपचार घेऊन बरे झालेल्या 9 रुग्णांना उद्या सुटी मिळणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे (इंगळे) यांनी माहिती दिली आहे.

हे देखील वाचा:

पिंपळगावात कोरोनाचे तांडव, आढळले तब्बल 25 पॉजिटिव्ह

सासुरवाडीहून परतताना जावयाचा भीषण अपघातात मृत्यू

Leave A Reply

Your email address will not be published.