कोरोना रुग्णसंख्येने तोडले सर्व रेकॉर्ड, आज 65 पॉजिटिव्ह

ऍक्टिव्ह रुग्णांची शंभरी पार, ग्रामीण रुग्णालयात रिपोर्टसाठी झुंबड

0

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 3 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 48 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 12 तर ग्रामीण भागातील 34 रुग्णांचा समावेश आहे. तर झरी आणि पांढरकवडा तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण तालुक्यात पॉजिटिव्ह आढळून आला आहे. यासह खासगी लॅबमध्ये 17 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यावरून एकूण रुग्णसंख्या 65 झाली आहे. दरम्यान आरोग्य प्रशासनाने टेस्टींगमध्ये प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात एकच झुंबड उडताना दिसत आहे.

आज 288 संशयीतांचे अहवाल यवतमाळ येथून प्राप्त झाले. यात 31 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 257 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 169 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 17 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 257 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 347 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 573 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 16 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 49 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 48 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 28 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1577 रुग्ण आढळून आलेत. यातील 1426 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

वणी न.प. अधिका-याला 25 हजारांचा दंड, माहिती देण्यास टाळाटाळ करणे भोवले

जनावर तस्करांवर मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Leave A Reply

Your email address will not be published.