आयपीएल सुरू, वणीत सट्टेबाजी सुरू

'खाया-लगाया'ची पहिल्याच दिवशी धूम

0

जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएलच्या 14 व्या सीजनची आजपासून सुरूवात झाली आहे. IPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI VS RCB) यांच्यात चेन्नईमध्ये सायंकाळी 7.30 वाजता सुरू झाला. दरम्यान सामना सुरू होण्याआधीपासूनच वणीत शौकीनानी सट्टा खेळणे सुरू केले आहे. नेहमीच्या स्पॉटवर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सट्ट्याला शहरात जोमात सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुस-या कामात असलेल्या पंटर देखील आता या नवीन जॉबमध्ये आला आहे.

वणी येथे क्रिकेटवर सट्टा खेळण्यासाठी यवतमाळ जिल्हा नव्हे तर राज्यातून क्रिकेट बुकी ऑनलाइन व ऑफलाईन डाव खेळतात. शहरात विविध ठिकाणी तसेच निर्जनस्थळी छुप्या पद्द्तीने क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यावर लाखो रूपयांचा सट्टा लावण्यात येत असल्याचे पोलिस कारवाईत स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या एका सीझनमध्ये केवळ वणी शहरात करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. क्रिकेट सट्ट्याच्या नादात शहरातील अनेक प्रतिष्ठित व युवावर्ग देशोधडीला लागले आहे.

मोबाइल व ऑनलाइन चालणा-या या सट्ट्या अड्ड्यावर पोलिसांनी अनेकदा धाड मारली. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वणी पोलिसांनी मुकूटबन रोडवरील शिरगिरी परिसरात निर्जन स्थळी कारमध्ये बसून सट्टा खेळताना 3 जणांना अटक केले होते. त्यांनंतर जानेवारी 2021 मध्ये यवतमाळचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या चमूने वणी येथील एका प्रतिष्ठित बिल्डरच्या कार्यालयावर धाड टाकून बिल्डरसह चार जणांना क्रिकेटवर सट्टा खेळताना अटक केली होती.

क्रिकेट बुकीच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्व्भूमीवर पोलिस प्रशासन कामात व्यस्त असल्यामुळे यंदाच्या आयपीएल सामन्यावरही वणीत क्रिकेटचा सट्टा पर्व मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याची शक्यता वारविली जात आहे. आता यावर वणी पोलीस कार्यवाही करणार की गेल्या वेळे सारखी यवतमाळहून स्पेशल पथक सिजन संपल्यावर येऊन कार्यवाही करणार की हा सेटिंगमधून अख्खा सिजनभर बुकींचे फावणार हे लवकरच स्पष्ट होईल.

हेे देखील वाचा:

तालक्यात कोरोना रुग्णसंख्येचा रेकॉर्ड, आज तब्बल 64 पॉजिटिव्ह

Leave A Reply

Your email address will not be published.