गुलजार यांच्या गीतांनी रंगली मैफल सिंफनीची
कलोतीनगर अमरावतीतील सिंफनी स्टुडियोचे आयोजन
बहुगुणी डेस्क, अमरावतीः आशयगर्भ गीतांसाठी गुलजार रसिकांच्या कायमस्वरूपी हृदयात आहेत. त्यांच्याच निवडक गीतांची मैफल सिंफनी गृपने प्रस्तुत केली. अमरावती येथील कलोती नगरातील सिंफनी स्टुडिओत रेकॉर्डिंग आणि चित्रिकरण झाले.
‘गुलजार स्पेशल’ या शीर्षकाखाली झालेल्या या ऑनलाईन मैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. सिंफनी गृपच्या सिंफनी ट्यून्स या युट्यूब चॅनलवर आणि फेसबूक पेजवर ही मॅफल ऑनलाईन झाली.
संजय व्यवहारे यांनी गायलेल्या ‘मुसाफिर हु यारो’ या गीताने मैफलीचा आरंभ झाला. त्यानंतर पल्लवी राऊत यांनी ‘गोरा गोरा अंग लैले’ आणि यारा सिली सिली ही गीतं पेश केलीत. अरविंद व्यास यांनी ‘हवावों पे लिख दू हवाओं के नाम’ आणि ‘फिर वही रात’ ही गाणी सादर केलीत. ‘
ए री पवन’ हे गीत डॉ. नयना दापूरकर यांनी एका वेगळ्या उंचीवर नेलं. जयंत वाणे यांनी गायलेल्या ‘वो श्याम कुछ अजीब थी’ या गीताने मैफलीत रंग भरला. गुरूमूर्ती चावली यांनी ‘ऐ अजनबी तू भी कही’ या गीतातून रसिकांची मने जिंकलीत. या मैफलीचं अभ्यासपूर्ण आणि रसाळ निवेदन नासीर खान आणि प्रीती मिश्रा यांनी केलं.
संगीत संयोजन सुनीत बोरकर यांनी केलं. पियानोची साथ सचिन गुडे यांनी तर तबल्याची साथ विशाल पांडे यांनी केली. चित्रिकरण आणि तंत्रदिग्दर्शन अमिन गुडे यांचं होतं. सिंफनीच्या रसिकांसाठी नवनवीन संकल्पनांसह विविध कार्यक्रम लवकरच सादर होणार असल्याचं सिंफनी गृपचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी कळवलं.
खालील लिंकवर कार्यक्रम कधीही पाहता येईल
हेदेखील वाचा
महावितरण विभागाचा भोगळ कारभारामुळे मांगली गावठाणातील जनता त्रस्त
हेदेखील वाचा