विवेक तोटेवार, वणी: गणेशपूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाला व्याजाचे आमिश दाखवून 58 लाख रुपयांची टोपी टाकणा-या नटवरलालच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. कन्हैया देवनारायण दास (37) रा. नेगुरा ता. कमालपूर जि. चंदोली उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम मेघदूत कॉलनी असे या भामट्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास त्याच्या राहत्या घरून अटक केली. सेवानिवृत्त शिक्षकाच्या तक्रारीनंतर सुमारे दोन महिन्यांपासून तो फरार होता.
सविस्तर वृत्त असे की, आनंदराव हरबाजी बोढाले (79) रा. गणेशपूर हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या मालकीची शेती विकली. यातून त्यांना 2 कोटी रुपये मिळाले. त्यांनी आपल्या तीन मुलींना 60, 60 लाख रुपये देऊन 20 लाख रुपये आपल्या जवळ ठेवले. आनंदराव हे धार्मिक प्रवृत्तीचे आहे. ते रोज वणीतील प्रगती नगर येथील प्रजापती ब्रह्माकुमारी पाठशाळा येथे ध्यान करण्यासाठी जायचे. यादरम्यान त्यांची ओळख कन्हैयाकुमार देवनारायण राम रा. नेगुसराय, ता. कमलपुर जिल्हा चांदेली उत्तर प्रदेश यांच्यासोबत झाली. कन्हैयाचे आनंदराव यांच्या घरी येणेजाणे सुरू झाले.
दरम्यान गप्पा गोष्टींमध्ये आनंदराव यांनी शेती विकून आपल्याला 2 कोटी रुपये मिळाले व हिस्से वाटणीनंतर त्यांच्या जवळ 20 लाख असल्याचे सांगितले. हे कळताच कन्हैयाने त्यांना टोपी टाकण्याचा प्लान केला. कन्हैयाने कोल इंडिया सोसायटी मध्ये गुंतवणूक केल्यास 14 टक्के व्याजाने पैसे मिळतात अशी त्यांच्याजवळ बतावणी केली. त्यांच्या गोष्टीला भुलून आनंदराव यांनी 12 जुलै 2019 कन्हैयाला 8 लाख रुपये दिले.
कन्हैयाने पैसे भरल्याची खोटी पावती आनंदरावांना यांना आणून दिली. त्यानंतर आनंदराव यांनी व त्यांच्या मुलींनी वेळोवेळी पैसे टाकले. याच्या डुप्लिकेट पावत्या हा कन्हैया आणून देत गेला. आनंदराव यांनी याबाबत काही मित्रांना या गुंतवणुकीबाबत सांगितले. त्यांना काही परिचितांनी अशी कोणतीच स्किम नसल्याचे सांगितले. त्यावरूनर आनंदराव यांना याबाबत संशय आला व त्यांनी पैसे परत मागितले.
कन्हैया यांने 10 दिवसात पैसे परत करतो म्हणून सांगितले. पण तो टाळाटाळ करीत होता. आनंदराव हे तो राहत असलेल्या मेघदूत कॉलनी येथील घरी गेले. यावेळी कन्हैया त्या ठिकाणी नव्हता. यावेळी त्याचा भाऊ घरी होता. त्याने सांगितले की कन्हैया हा गावाला गेला आहे. लॉकडाऊन असल्याने तो आता परत येऊ शकत नाही. लोकडॉउन संपताच तो येईल.
आनंदराव यांनी कन्हैया याचा फोन लावून बघितला परंतु तो बंद येत होता. आनंदराव यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कन्हैयाराम यांच्याविरुद्ध कलम 406, 420, 468, 471 नुसार गुन्हा नोंद केला होता.
अखेर मिस्टर नटवरलाल गजाआड
कन्हैया 58 लाख रुपयांची टोपी टाकून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र त्याचा पत्ता लागत नव्हता. आज शनिवारी दिनांक 17 एप्रिल रोजी तो वणीला परत येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली. वणी पोलिसांना कन्हैया हा मेघदूत कॉलनी येथील त्याच्या घरी परत आल्याचे कळताच संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास घरी धाड टाकून त्याला अटक केली. सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोऊनी शिवाजी टिपूर्णे, अमोल नुनेलवार यांनी केली.
वणी बहुगुणी हे देखील वाचा: