मारेगावात कापूस खरेदी मुहुर्ताला 4 हजार 5 रुपये प्रति क्विंटल भाव
दिवाळी आधी पांढऱ्या सोन्याची कवडीमोल भावाने खरेदी
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दि.२१ आॅक्टोबरला कापूस खरेदी केन्द्राचा मुहूर्त झाला, 4 हजार 5 रुपये प्रति क्विंटल भाव निघाला. शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट उमटत होती. कापुसात ओलावा असल्याचं कारण समोर करीत कापूस खरेदी केन्द्रे दिवाळी नंतर सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली.
शेतकऱ्याच्या दृष्टीने खरिप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने कृषीमालाची वाढ रोखल्या गेली. पोळ्यानंतर पाऊस काही प्रमाणात आला, त्यातच फवारणीतुन विषबाधा प्रकरण, कर्जमूक्तीसाठी अटी शर्थी, वन्यप्राण्यांची धुडगुस, याने शेतकी बेजार झाला होता. दिवाळी सण आला अन् गेला परंतु शासनाने कापूस खरेदी केन्द्र सुरु न केल्याने शेतकऱ्याने घरी साठवून असलेला कापूस, सोयाबीन कवडी मोलाने विकून कशीबशी दिवाळी साजरी केली.
या वर्षी कापूस खरेदी उशीरा सुरु झाली. याचाच फायदा घेत अनेक व्यापाऱ्यांनी खेड़ा खरेदी सुरु करुव गरीब शेतकऱ्यांचे पांढरे सोने कवडी मोल भावाने खरेदी सुरु केली. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मारेगाव तालुक्यात पाउस कमी पडला, त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या मालाची वाट लावली.
वर्ष भर काबाड कष्ट करुन शेतात मालाची पेरणी केली आणि उत्पन्न हातात येण्याच्या वेळेला हातात निराशा आली. शेवटी पाऊस असा पड़ला की सोयाबीन, कपाशीचे पीक खराब झाले. काही प्रमाणात कापूस ओला झाला. याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले. पाच हजार किमतीचा कापूस शेतकऱ्यांना आपल्या गरजेमुळे बेभाव वीकावा लागला. दरम्यान अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली.