जिल्हाधिकाऱ्यांची मारेगाव येथील कोविड सेंटरला भेट

आरोग्य प्रशासनास धरले धाऱ्यावर

0

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील पुरके आश्रम शाळेतील कोविड सेंटरला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज 25 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजता अचानक भेट देऊन कोविड सेंटरची पाहणी केली. तसेच येथील तहसील कार्यालयात पार पडलेल्या “कोविड 1” च्या विषयावर मारेगाव तालुक्याचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत तालुका स्तरीय कोरोना नियंत्रण समितीला धाऱ्यावर धरून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी यांनी प्रथम मारेगाव येथील कोविड सेंटर वर भेट दिली. दरम्यान कोविड सेंटर ची पाहणी करून सेंटर वरील सोयी सुविधांची आरोग्य प्रशासन कडून माहिती जाणून घेतली. पुन्हा एका रुग्णवाहिकेची स्थानिक पातळीवर नियोजन करावे असे सांगितले.

दरम्यान सरळ ताफा तहसील कार्यालयात जाऊन तालुका कोरोना नियंत्रण समितीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, नगर पंचायत चे अधिकारी वर्ग उपस्थित होते.या बैठकीत खासकरून आरोग्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे व जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पंचाळ यांनी धाऱ्यावर धरले.

या बैठकीत तालुक्यातील कोविड 19 च्या तपासण्या वाढवून रोज 500 कराव्यात, होम आयसोलेशन ची संख्या कमी करून कोविड सेंटरवर उपचार करावा तसेच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरा समोर स्टिकर लावावे, त्यांना होम क्वारंनटाईन चा शिक्का मारावा, त्याच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करून त्यांच्या तपासण्या कराव्या,रुग्णाचे मृत्यू होऊ देऊ नका,कोरोनाचे सॅम्पल तपासणी साठी रोज जिल्हा स्थळावर पाठवावे. तसेच पुन्हा एक कोविड सेंटर साठी ईमारतीची व्यवस्था करावी आदी सूचना बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी व सीईओ यांनी तालुका कोरोना नियंत्रण समितीला दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, नायब तहसीलदार दिगाबंर गोहोकार, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाले, नगर पंचायत चे अभियंता निखिल चव्हाण,प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गेडाम,नोडल अधिकारी डॉ. शेख,स.पो.नि.अमोल चौधरी आदी उपस्थित होते. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.