उमरी येथे कोरोनाचे 31 रुग्ण, आज तालुक्यात 135 पॉझिटिव्ह

तालुक्यातील 66 रुग्णांची कोरोनावर मात

0

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 2 मे रोजी तालुक्यात 135 पॉझिटिव्ह आलेत. यात तर 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 37 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 89 पॉझिटिव्ह आढळून आलेत. यात एकट्या उमरी येथीलच 31 आहेत. तर आज तालुक्यात इतर ठिकाणचे 9 रुग्ण आढळलेत. आज 7 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

वणी शहरात आलेल्या 37 रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथे सर्वाधिक 8 रुग्ण तर श्रीकृष्ण भवन येथे 7, तेली फैल, जैन ले आऊट, गुरुनगर, नारायण निवास येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर जत्रा रोड, रंगारीपुरा, वॉटर सप्लाय, राधा नगरी, देशमुखवाडी, काजीपुरा, भीमनगर, झेडपी कॉलनी, गांधी चौक, रविनगर, माळीपुरा, सुगम हॉस्पिटल, राजीव गांधी चौक, रामपुरा वार्ड येथे प्रत्येक 1 रुग्ण आढळला आहेत.

ग्रामीण भागात आलेल्या 89 रुग्णांमध्ये एकट्या उमरी येथे 31 रुग्ण आढळले आहेत. तर नांदेपेरा यथे 6, चिखलगाव येथे 5, मेंढोली, गणेशपूर येथे प्रत्येकी 4 रुग्ण तर भांदेवाडा, वांजरी, पुनवट येथे प्रत्येकी 3 रुग्ण तर भालर कॉलरी, ब्राह्मणी, उकणी, पद्मावती कॉलनी लालगुडा, वडगाव येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. याशिवाय परमडोह, नवरगाव, विरकुंड, शिंदोला, झरपट, भालर, मजरा, पळसोनी, कायर पिंपरी, वांजरी, बोदाड, वागदरा, निंबाळा, निवली, मानकी, शेलू खुर्द, मोहुर्ली, शिरपूर, बोर्डा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर मारेगाव तालुक्यातील 7 रुग्ण, झरी व कोरपना तालक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण आज वणीत पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 236 अहवाल प्राप्त झाले यात 44 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. याशिवाय आज 366 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 91 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 7 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे.

सध्या तालुक्यात 631 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 33 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 566 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 33 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 3322 रुग्ण आढळून आलेत. यातील 2637 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 54 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

पहाटे पहाटे शहरात उडाली सीबीआयच्या धाडच्या अफवेने खळबळ

मारेगावच्या मदतीला धावून आला भूमिपुत्र

Leave A Reply

Your email address will not be published.